भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या बैठकीसाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाजपा नेते नितेश राणेही यावेळी उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राणे यांचा पारा यावेळी चढला आणि नंतर हसत त्यांनी “मी आता बदललो आहे भाजपामध्ये आल्यापासून मी चिडत नाही” अशी मिश्किल प्रतिक्रियाही दिली.