काँग्रेसचे सचिव के. सी. वेणुगोपाळ यांनी मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची निवड केल्याची माहिती दिली. यानंतर “सर्वकाही ठीक आहे आणि यापुढेही सर्व चांगलं होईल. आपल्या सर्वांना एकत्र काम करायचं आहे आणि ते आपण स्वीकारलं आहे, असं राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे”, असं डी. के. शिवकुमार म्हणाले. त्यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, २० तारखेला शपथविधी होणार आहे. त्याआधी शिवकुमार पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत