काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अंबानी यांच्या अॅन्टिलिया या निवासस्थानी जे स्फोटके सापडले होते, ते फडणवीसांनीच ठेवले होते, असा मोठा आरोप नाना पटोले यांनी केला. नाना पटोलेंच्या या आरोपावर आज देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. २६/११ चा बॉम्बस्फोट नाना पटोलेंनी केला असं स्टेटमेंट द्यावं का अशी माझी इच्छा झाली आहे, असं फडणवीस म्हणाले. ते पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.