मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकारकडून होत असणाऱ्या कथित केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावर टीका केली. नुकत्याच राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीवर बोलताना ठाकरे म्हणाले की, “सध्या देशात ईडी-काडीचे व्यवहार सुरू आहेत. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाहीये त्यामुळे उद्या जेव्हा दुसरं सरकार येईल तेव्हा ते हे दुप्पटीने करेल याचा विचार करणं गरजेचं आहे”