आयएल आणि एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज ( २२ मे) ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ईडी चौकशीपूर्वी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘माझा आय.एल आणि एफ.एस या कंपनीसोबत कधीही संबंध आला नाही. ज्याला जे समजायचं आहे ते त्यांनी समजावं कारण माझं कोणासोबत ही बोलणं झालेलं नाही. मला ईडीमध्ये बोलवलं आहे त्यामुळे त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देईन’