आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचं वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची ईडी चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडी आणि भाजपाचा निषेध केला जात आहे. पुण्यातही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ईडी आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.