कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १३५ हून अधिक जागा मिळवत काँग्रेसने मुसंडी मारली. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटक विधानसभा गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली आहे. तसंच या ठिकाणी पूजाही केली आहे.