राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांची आज (२२ मे) ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनॅन्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आलं होतं. आयएल अँड एफएसकडून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
रिपोर्टर: सागर कासार