मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाई आणि रस्ते पाहणी दौऱ्याला ठाणे येथील पोखरण रोड नंबर २ इथून सुरुवात केली. यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना चांगलंच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. यावेळी वेळेत काम पूर्ण न केल्याने महापालिका आयुक्तांना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले.