रिझर्व्ह बॅंकेन २ हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत नागरिकांना देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका मांडली. १०००, ५०० प्रमाणेच २ हजाराच्या नोटाही घोषणा झाली त्याच दिवशी बंद करायच्या होत्या, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.