जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. परंतु, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी याप्रकरणी भाष्य करणं टाळलं होतं. तसंच आपल्याला अनेकांचे फोन आले होते, असं सांगतानाच अजित पवारांनी फोन केला नसल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. अजित पवार यांनी आता या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.