जी-७ परिषदेत आपली छाप पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. सिडनीतल्या कुडोस बँक एरिनामध्ये भारतीय पंतप्रधानांचं जंगी स्वागत करण्यात आलं. येथे जमलेल्या हजारो अनिवासी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन नागरिकांशी नरेंद्र मोदी संवाद साधला. यावेळी तिथल्या नागरिकांना आपल्या भाषणात सामावून घेत भारताच्या प्रगतीचा संदर्भ देत घोषणा दिल्या.