राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या ठाण्यात जनसुनावणीसाठी उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महिलांचे विविध प्रश्न, त्यांच्या तक्रारी याबद्दल त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्याच्या बालविकास मंत्रीही महिला नाहीत अशी खंत बोलून दाखवली. दरम्यान, राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची चर्चा देखील आहे.