‘नव्या संसद भवनाची काय गरज होती? आपली जुनी संसद आणखी १०० वर्षे टिकणार इतकी बळकट आहे. तरीही या सरकारने नवी संसद उभारली. तरीही राष्ट्रपतींना उद्घनापासून का डावललं आहे? नावाच्या पाट्या लावण्यासाठी नवी संसद उभारली आहे का’? असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं असं वारंवार मोदी सांगत होते. मग राष्ट्रपती महिलेची आठवण संसदेचं उद्घाटन करताना का झाली नाही? २८ मे रोजी नव्या संसद भवनाचा जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्यावर काँग्रेससह आमचा बहिष्कार आहे’