येत्या २८ मे रोजी दिल्लीत नव्या भव्य अशा संसद भवनाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी पत्रकार परिषद घेतली. कार्यक्रमाची एकंदर रुपरेषा काय असेल याबद्दल त्यांनी माहिती दिली. नव्या संसद भवनात ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती होणार असून पारंपरिक राजदंड ‘सेंगोल’ येथे ठेवला जाणार आहे. या बद्दलचा एक किस्साही अमित शहांनी सांगितला.