राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवेळी पक्षातील प्रमुख नेत्यांची गैरहजेरी होती. तर आपल्याला अजित पवारांचा फोन आलेला नाही, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यावरून जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.