पोलीस भरती २०२३च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. पेपर होण्याआधीच तो फुटला असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याविरोधात आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आज विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर निदर्शने केली. तसंच पोलीस भरतीचा पेपर परत घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.