महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२ वी चा निकाल जाहीर झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा निकाला हा ९१.२५ टक्के लागला असून कोकणाने ९६.०१ टक्क्याने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर यंदा मुंबई सर्वात कमी ८८.१३ टक्के असा निकाल लागला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. दरम्यान, राज्यातून यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
रिपोर्टर – सागर कासार