१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या (ठाकरे गट) शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली. याआधी विधानसभेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी अध्यक्षांना पत्र दिलं होतं. त्याची दखल घेत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली.