Arvind Kejriwal Meets Sharad Pawar: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईत वाय. बी. सेंटरमध्ये भेट घेतली. याआधी बुधवारी अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी “दिल्लीच्या लोकांबरोबर खूप अन्याय झालाय. २३ मे रोजी एका साध्या अधिसूचनेनुसार अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे सगळे अधिकार केंद्र सरकारने हिसकावून घेतले” अशी भावना व्यक्त केली.