डोंबिवली काँग्रेसतर्फे हात जोडो अभियान तसेच पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह स्थानिक नेते मंडळी तब्बल अडीच तास उशिरा पोहोचली. या कार्यक्रमास खासदार कुमार केतकर हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू होताच कुमार केतकर यांनी लेट लतिफ नेत्यांचे कान टोचले.”काँग्रेस पक्ष हा पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा पक्ष आहे हे दोघेही कायम वेळेवर यायचे. नाना पटोले आणि कुमार केतकर यांच्यापेक्षा त्यांची लोकप्रियता जास्त होती. असा उशीर केला तर २०२४ मध्ये मोदींचे सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासाने पोहोचू” असा खोचक टोला त्यांनी लगावला.