नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरुन सुरु झालेला वाद संपलेला नाही. ठाकरे गट, काँग्रेस या सोहळ्यावर बहिष्कार टाकत असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही या संदर्भात आपलं भाष्य केलं आहे. “आरएसएस आणि भाजपा हे वैदिक धर्माचे अनुयायी आणि प्रचारक आहेत. वैदिक धर्मात महिला आणि आदिवासींना स्थान नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत. आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीत महिला आणि आदिवासीही माणूस नाहीत. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती असूनही नव्या संसदेचे उद्घाटन स्वतःच्या हाताने करण्याऐवजी भाजपा आपल्या माणसांच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करून घेत असल्याचे दिसून येत आहे. याचा आम्ही निषेध करतो. त्यांना स्थान नाही” अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.