अभिनेत्री प्रिया बापट ही मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या कामाबरोबरच तिच्या लूक्सचे लाखो चाहते आहेत. प्रिया तिच्या फिटनेसकडे जाणीवपूर्वक लक्ष देताना दिसते. फिटनेससाठी अनेकजण तिला फॉलो करतात. पण तिने तिचं आरोग्य इतकं छान कसं सांभाळलं आहे, हे तिने उघड केलं आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीजच्या निमित्ताने प्रियाने सचिन पिळगावकर, अतुल कुलकर्णी आणि इजाज खान यांच्यासह ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या फिटनेसचं गुपित सांगितलं.