३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वतंत्र कार्यक्रमासाठी मागितलेली परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाने नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, गेल्यावर्षी देखील जयंतीच्या या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि पडळकर आमने-सामने आले होते. त्यामुळे यंदा देखील हा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत.