केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी नागपूरात त्यांच्या निवासस्थानी समर्थकांनी एकच गर्दी केली आहे. तसंच कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी गडकरींनी माध्यमांशी संवाद साधत शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.