भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे, असं विधान शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केलं होतं. त्यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवण्याच्या भूमिकेतून भाजपा काम करत होती. म्हणून आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो, असं राऊत म्हणाले.