सत्ता संघर्षाचा निकाल लागला असला तरी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. भरत गोगावले यांची प्रतोदपदीची निवड सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप आता लागू होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. व्हीप आणि गटनेता नेमका कोणाचा याबद्दलचा मुद्दा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे.