गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची ३० मे रोजी प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी वयाच्या ४८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ता ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार हा त्यांचा राजकीय प्रवासही नेमका कसा होता जाणून घेऊ.