भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा आज १ जून रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी भोसरीत भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावले. एकीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार असताना अशा फ्लक्लेबाजीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता विलास लांडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.