गौतमी पाटील हे प्रकरण मागील वर्सभरात महाराष्ट्रात चांगलंच चर्चेत राहिलं आहे. आधी अश्लील नृत्य मग कार्यक्रमातील राडे, कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ आणि आता गौतमीच्या पाटील आडनावावरून पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. अशातच आता गौतमीच्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते गौतमी पाटीलने “मी आता एकटाच राहात असल्याने मला आर्थिक मदत करावी” अशी मागणी केलीये.