भारतीय संविधानाच्या साक्षीनं बांधली विवाहाची रेशीमगाठ!; भंडाऱ्यातील विवाह सोहळा ठरतोय कौतुकाचा विषय
लग्न म्हंटलं की प्रचंड खर्च मोठा दिमाखदार सोहळा या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात पण भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे झालेल्या एका विवाहाची सर्वत्र चर्चा आहे. बरं ही चर्चा या सोहळ्यात काही लाखो रुपये खर्च झाले किंवा महागड्या गिफ्ट दिले गेले म्हणून नाहीये तर या विवाह सोहळ्यात नवऱ्या मुलीनं चक्क भारताचं संविधान हातात घेऊन वाजत गाजत लग्नमंडपात एन्ट्री केली एवढंच नाही तर याच संविधानाच्या साक्षीने तिने विवाहाची रेशीमगाठही बांधली