ओडिशाच्या बालासोर या ठिकाणी झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातात २३३ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेविषयी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. हा अपघात इतका भीषण होता की मदत आणि बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला गॅस कटरच्या मदतीने मृतदेह काढावे लागत आहेत. हा अपघात पाहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने त्याने पाहिलेली परिस्थिती सांगितली आहे जी अंगावर काटा आणणारी आहे.