ओडिशातील बालासोर येथे काल संध्याकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात २३३ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला. “दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात येणार आहे, मात्र सध्याचा फोकस केवळ बचावकार्यावर राहील” असं वैष्णव म्हणाले.