ओडिशातील रेल्वे अपघाताने अवघा देश हळहळला होता. अखेर अथक प्रयत्नांनंतर येथील रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. अपघातग्रस्त ठिकाणाहून रविवारी रात्री पहिली रेल्वे धावली. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे माध्यमांना प्रतिक्रिया देताना भावूक झाले होते.