Sonu Sood On Odisha Train Accident: ओडिशातील रेल्वे अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेबद्दल समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. फिल्म सेलिब्रिटींनीसुद्धा याबाबतीत ट्वीट करत हळहळ व्यक्त केली आहे. ज्युनिअर एनटीआर, विवेक अग्निहोत्री, अक्षय कुमार, सनी देओल, परिणीती चोप्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.