शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.त्यापूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण भागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार अमोल कोल्हे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना समज देताना “भांडू नका, नाहीतर कानाखाली आवाज काढेन! तुमच्या भांडणामुळे तुमची नाही तर आमची बदनामी होते” असे वक्तव्य केले.