पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊनगर ठेवण्यात यावं अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. या आशयाचे फलक पिंपरी- चिंचवड शहरातील विविध भागात लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून ही मागणी करण्यात आली आहे.