या सरकारमध्ये फाईलवर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही असे आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते त्यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “अजित दादा हे विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे ते त्यांची भूमिका निभावित आहे. परंतु त्यांनी सांगावे की ते मागच्या सरकारमध्ये होते तेव्हा मुख्यमंत्री त्यांना भेटत होते काय? शरद पवार साहेबांनी आपल्या पुस्तकात काय लिहिले आहे ?”