अजित पवार यांनी ते अर्थमंत्री असताना किती खोके जमवले ते सांगावं. खोक्यांशिवाय अजित पवार काम करत नव्हते. असा गंभीर आरोप, शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत थेट त्यांना आव्हान दिलं आहे. आरोप सिद्ध केला तर मी राजकारण सोडेन, असं अजित पवार म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.