७ जून बुधवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये तब्बल सहा तास चर्चा झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत दिली. १५ जूनपर्यंत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं जाईल. या दरम्यान कुस्तीपटू आंदोलन करणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.