आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावरून विरोधकांनी सरकार आणि गृहविभागाला जाब विचारला आहे. खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं. ठाकरे सरकारच्या काळात अशा दंगली घडल्या नव्हत्या असंही ते म्हणाले.