‘राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपतींच्या इतिहासाबाबत केलेले वक्तव्य ही भाजपाची लिहिलेली स्क्रिप्ट आहे, तर पेशव्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली हे धादांत खोटं राज्यपाल कसं बोलू शकतात? मराठा साम्राज्याची स्थापना केवळ छत्रपती शिवरायांनी केली आहे; तर पेशवे हे छत्रपतींचे नोकरदार होते’ असे वक्तव्य राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी केलं. ‘राज्यपाल यांनी पहिला इतिहास समजून घ्यावा’ अशी सुचनाही मिटकरी यांनी केली.