आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी कुठेही लाठीचार्ज झाला नाही, असं म्हटलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये वारकरी आळंदीत पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये नेमकं काय घडलं याबद्दल बोलत आहे.