आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा निषेध सर्वत्र होत असून विरोधकांनी देखील सरकारला सुनावलं आहे. या पार्श्वभूमीवर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं का घडलं याची माहिती दिली आहे. ११ जून रोजी नागपूरमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.