ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश याग करण्यात आला. यावेळी ३३ किलोच्या मोदकाचा प्रसाद गणपती बाप्पाला ठाकरे गटाच्या उपनेत्या व उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवराज पारीख यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असताना सर्व सामान्य नागरिकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरणाच्या दृष्टीने जे काही संकल्प आणि उपक्रम आहेत. त्या सर्वांना गणपती बाप्पाने यश देवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना केली”