“सगळं हास्यास्पद आहे, स्वतःच एजन्सीकडून स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रकार आहे. अशी जाहिरातच हास्यास्पद आहे. आज सर्व जनता त्रस्त आहे. बेरोजगारी, शेतकरी, मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार होते, लोकांचा डोळ्यात धूळफेक करण्याचे काम शिंदे करत आहे. शिंदेंच्या मतदार संघात जाऊन पाहिले तर खरी परिस्थिती लक्षात येईल. ४० पैकी तीन किंवा चारपेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती असताना, असा सर्व्हे दाखवला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिशाभुल करू नये’ अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि कॉँग्रेस नेते अनिल देशमुख यांनी दिली.