बिपरजॅाय चक्रिवादळ हे गुरुवारी सायंकाळी ४ वाजता गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकणार आहे. अरबी समुद्रात नैऋत्येकडे घोंघावत निघालेल्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघरमधील समुद्रात बिपरजॅायचा प्रभाव दिसून येत आहे.