गुरूवारी (१५ जून) सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीसाठी आमदार बच्चू कड उपस्थित राहिले होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील नाराजीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दोघांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं सांगितलं. तसंच ४० आमदारांवर भाजपाकडून निर्माण केल्या जाणाऱ्या दबावावरही त्यांनी भाष्य केलंय.