Sanjay Raut: ‘शिंदेची जत्रेतील शिवसेना, जत्रा उठली की तंबू देखील उठतील’; संजय राऊतांची टीका
“शिवसेनेचा वर्धापन दिन १९ जूनला आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनाला संबोधित करणार आहेत. गावच्या जत्रेत तंबू असतो. त्या तंबूत खोटा चंद्र असतो. खोटी मोटारसायकल असते. लोक चंद्र पाहून फोटो काढतात. तशी ही शिंदेंची खोटी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे. शिंदेंची शिवसेना ही जत्रेतील शिवसेना आहे. आमचा वर्धापन दिन वाजतगाजत आणि जोरात होणार आहे. उद्या वरळीला आमचं शिबीर आहे. ते जोरात होईल. जत्रा संपली की जत्रेतील तंबू उठतील” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना (शिंदे गट) यांचावर केली