माजी मंत्री आणि राष्ट्रावादी नेते जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात पन्नास खोक्यांची होळी करीत “गद्दार दिन” साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर आनंद परांजपे यांना पोलिसांनी अटक केली. मागील वर्षी २० जून रोजी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठून महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्याचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले